तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर...!

    दिनांक  30-Jul-2019


 


नवी दिल्ली : राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ९९ विरुद्ध ८४ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) अद्याप बहुमत नसल्याने यापूर्वीही या विधेयकाला विरोध झाला होता. मात्र हे विधेयक मंजूर झाल्याने केंद्र सरकार व मुस्लिम समाजातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

तिहेरी तलाक विधेयक - आतापर्यंत काय घडलं ?

 

२२ ऑगस्ट २०१७ : सर्वोच्च न्यायलयाने तिहेरी तलाक अवैध ठरवलं, याबाबत कायदा बनविण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

 

डिसेंबर २०१७ : तिहेरी तलाक दिल्यास ३ वर्षाची शिक्षा; लोकसभेने विधेयकाला मंजुरी दिली

 

१० ऑगस्ट २०१८ : काही सुधारणांसह तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत ; पण पारित करण्यात सरकार अपयशी

 

१९ सप्टेंबर २०१८ : तिहेरी तलाक गुन्हा ठरवणारा अध्यादेश

 

३१ डिसेंबर २०१८ : तिहेरी तलाक विधेयक समीक्षा समितीकडे पाठवा राज्यसभेत विरोधी पक्षांची मागणी

 

२५ जुलै २०१९ : तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत चर्चा व मंजुरी

 

३० जुलै २०१९ : तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat