कर्नाटकमध्ये टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचा निर्णय

    दिनांक  30-Jul-2019
बंगळूरू : कर्नाटकमध्ये नवनिर्वाचित भाजप सरकारतर्फे टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे कन्नड सांस्कृतिक विभागाला या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. २०१५ मध्ये सिद्धारामय्या सरकारने भाजपच्या विरोधानंतरही टीपू सुलतान जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

 

राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार, टीपू सुलतान जयंती साजरी करण्याची आपली परंपरा नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्येही यंदा जयंती साजरी केली जाणार नाही. सिद्धरमय्या यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला आहे. कडगू येथील आमदार के.जी.बोपैय्या यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र लिहून टीपू सुलतान जयंती साजरी करू नये, असे आवाहन केले होते.

 

का आहे टीपू जयंतीला विरोध ?

कर्नाटकस्थित कडुग या भागातील लोकांनी इतिहासाचा दाखला या कारणासाठी दिला आहे. आमदाराने आपल्या पत्रात उल्लेख केल्यानुसार, कडुग जिल्ह्यावर टीपू सुलतानाने विनाकारण हल्ला केला होता. यावेळी झालेल्या युद्धात असंख्य लोक मारले गेले होते. आमच्या ग्रामस्थांशी जोडल्या असल्याने टीपू सुलतान जयंती साजरी केली जाऊ नये, असे त्या आमदाराने म्हटले आहे.

 

कॉंग्रेस सरकारच्या काळात साजरी केली जात होती जयंती

भाजप आणि मित्रपक्षांनी नेहमी टीपू सुलतानच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र, कॉंग्रेस सरकारच्या काळात टीपू सुलतान जयंती साजरी केली होती. कर्नाटकमध्ये टीपू सुलतान जयंतीच्या मुद्द्यावरून राजकारण नेहमी तापत असते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat