बेस्ट तिकीट दर कपात तीन चार दिवसात लागू

    दिनांक  03-Jul-2019



आरटीएची मंजुरी; लाखो प्रवाशांना मिळणार दिलासा


मुंबई : बेस्ट परिवहन विभागाची आथिॅक कोंडी फोडत प्रवासी वाढण्यासाठी तिकीट दर कपातीला बेस्ट समितीनंतर पालिका सभागृहातही मंजुरी मिळाली आहे. आता आरटीए (रोड ट्रान्स्पोर्ट अँथॉरिटी)ची मंजुरी मिळाली असून तीन चार दिवसात बेस्ट तिकीट दर कपात लागू होणार आहे.

 

बेस्टच्या इतिहासात भाडेवाढीचे अनेक प्रस्ताव आले. परंतु सरसकट भाडेकपातीचा हा ऐतिहासिक प्रस्ताव आहे. आता पाच किलोमीटरपर्यंत ५ रुपये, १० किलोमीटरपर्यंत १० रुपये, १५ किलोमीटरपर्यंत १५ रुपये आणि १५ किलोमीटरपेक्षा पुढील अंतरासाठी २० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. हे भाडे साध्या, मर्यादित आणि जलद गाड्यांसाठी कायम राहणार आहे. वातानुकूलित गाड्यांसाठी याच अंतरासाठी ६, १३, १९ आणि २५ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat