रवीना टंडनची माफी; ट्विट केले डिलीट

03 Jul 2019 15:31:02



दंगल गर्ल जाहिरा वसिमने बॉलिवूडमधून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केल्यापासून सिने क्षेत्रात एकच खळबळ माजली होती. मग काही लोकांनी या गोष्टीला पाठिंबा दर्शवला तर काहींनी विरोध. दरम्यान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिने जाहिरा वसिमच्या या निर्णयाविषयी आपले मत व्यक्त करताना,"फक्त चित्रपट करून चित्रपट क्षेत्राच्याप्रति इतक्या कृतघ्नपणे कसे वागू शकतात, इतकीच इच्छा आहे की त्यांनी कृतज्ञता दाखवावी आणि आपली मते स्वतःकडे ठेवावी" अशा आशयाचे ट्विट तिने केले होते.

या ट्विट ला देखील बऱ्याच जणांनी विरोध केला तर काहींनी सहमती दर्शवली. मात्र आज आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागत तिने हे ट्विट डिलीट केले. आता यामध्ये नक्की कोणाचे मत बरोबर हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे मात्र असे प्रसंग आपल्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य शाबूत आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी उपयुक्त ठरतात हे देखील तितकेच खरे आहे असे म्हणावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0