
बऱ्याच वादविवादानंतर कंगना तणावत आणि राजकुजमार राव यांच्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आणि या ट्रेलरला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. चित्रपटामध्ये एक मुख्य भूमिका साकारणाऱ्या राजकुमार राव याने आत्ता कुठे लढाईला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच पूर्वग्रह बनवू नका असा सल्ला प्रेक्षकांना देत चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला.
शोभा कपूर आणि एकता कपूर यांची निर्मिती असलेल्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटात एक खुनाची रहस्यमय कथा उलगडणार आहे ही कथा कनिका धिल्लन यांनी साकारली असून प्रकाश कोवेळामुडी ही कथा दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यावर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढेल यात शंका नाही. हा चित्रपट येत्या २६ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.