Fact Check : मोदी-मनमोहन सिंह भेटीचा 'तो' व्हिडिओ २०१४ सालचा

    दिनांक  03-Jul-2019


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाच जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान व अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना भेटले असा दावा कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. तसेच निर्मला सितारामन यांनीही मनमोहन सिंह यांच्याशी भेट घेत अर्थसंकल्पाबद्दल चर्चा केल्याचे बोलले जात आहे. मात्र, हे दोन्ही दावे खोटे असल्याचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.


 

खुशबू भगत यांनी सर्वप्रथम हा व्हिडिओ ट्विट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी, विकासदराबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले. मात्र, मोदींनी अशाप्रकारे कोणतीही भेट घेतली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहील्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मनमोहन सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मोदी यांनी विकासदराबद्दल मनमोहन सिंह यांची भेट घेतल्याचा दावा खोटा ठरला. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही मनमोहन सिंह यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ खुशबू यांनी ट्विट केला होता. त्यातही भाजपवर टीका करत त्यांनी अर्थशास्त्राचे धडे घेण्यासाठी निर्मला सितारामन यांनी मनमोहन सिंह यांची भेट घेतल्याचे ट्विट केले आहे. मात्र, ही भेट अनौपचारीक असून त्यात अर्थसंकल्पाबद्दल कोणतीही चर्चा न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. निर्मला सितारामन यांनी मनमोहन सिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. मात्र, केवळ अनौपचारीक भेट असून त्यात अर्थसंकल्प किंवा अन्य कोणतिही चर्चा झाली नाही. त्यामुळे खुशबू यांचे दोन्ही दावे खोटे ठरले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat