अंबाती रायडूने केली निवृत्तीची घोषणा

    दिनांक  03-Jul-2019
 


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर अंबाती रायडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेटमधल्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. रायडूला विश्वचषकातील संघात स्थान दिले नव्हते पण रायडून आयपीएलमध्ये खेळले का नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही.

 

विश्वचषकातील संघात रायडूला आरक्षित खेळाडू म्हणून ठेवले होते. त्याच्याऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली होती. निवडकर्त्यांनी शंकरला संधी देण्यामागे तो थ्रीडी म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असल्याचे कारण देण्यात आले होते. यावर रायडूने मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी थ्रीडी चष्मा घालत असल्याचा टोलाही लगावला होता.

 

रायडूला सोडून पंत आणि मयंकला संधी वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यावर रायडूला संधी दिली नाही. त्याऐवजी ऋषभ पंत आणि मयंक अग्रवालला घेण्यात आले. आयसलंड क्रिकेटने ट्वीट करून रायडूला आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती. ५५ वनडेत १ हजार ६४९ धावा रायडूने ५५ वनडे सामन्यात ४७.०५ च्या सरासरीने १ हजार ६९४ धावा ठोकल्या आहेत. यात त्याने तीन तीन शतक आणि १० अर्धशतकांचा सामावेश आहे. रायडूने सहा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १०.५० च्या सरासरीने ४२ रन बनवले आहेत पण त्याला कसोटी खेळण्याची कधीच संधी मिळाली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat