बाटला हाऊस चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

29 Jul 2019 17:39:55



जॉन
अब्राहम मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाटला हाऊस' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये जॉन एका वॉकी टॉकीवर बोलताना दिसत आहे. एका गंभीर विषयावर बोलतानाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले आहेत. किससे सच सुनन है आपको? असा प्रश्न प्रेक्षकांना विचारत जॉनने हे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.



दरम्यान या पोस्टर बरोबरच चित्रपटातील नोरा फतेहीवर चित्रित करण्यात आलेल्या ' साकी साकी' या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहेच. निखिल अडवाणी दिग्दर्शित बाटला हाऊस या चित्रपटात जॉन अब्राहामसह या चित्रपटात मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारणार आहे. येत्या १५ ऑगस्टला देशभक्तीने ओतप्रोत भरलेला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबरीने अक्षय कुमार चा मिशन मंगल देखील त्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता या दोन्हीपैकी कोणता चित्रपट प्रेक्षकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0