कर्नाटकात भाजपच; विश्वासदर्शक ठराव जिंकला !

29 Jul 2019 13:03:46



बेंगळुरू : कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत आवाजी मतदान घेत विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. यावेळी विधानसभा सदस्यांनी भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या बाजूने आवाजी मतदान केले. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन झाले आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात १६ आमदारांनी बंड पुकारल्याने मागील महिनाभर कर्नाटकमध्ये नाराजी नाट्य रंगले होते. यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाही. यानंतर येडियुरप्पा यांनी सरकारस्थापनेचा पुन्हा एकदा दावा केला. यात त्यांना यश आले आहे. सध्या भाजपाकडे १०६ आमदार असून काँग्रेस आणि जेडीएसकडे १०० आमदारांचे संख्याबळ आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0