सुदर्शन पटनाईक पीपल्स चॉईस पुरस्काराने सन्मानित

29 Jul 2019 18:52:23



सुदर्शन
पटनाईक हा भारतातील एक प्रसिद्ध सॅण्ड आर्टिस्ट असून त्यांना अमेरिकेतील पीपल्स चॉईस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ही भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. बोस्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सॅण्ड स्कल्पटिंग महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून फक्त १५ भाग्यवान कलाकारांची निवड करण्यात आली त्यामध्ये सुदर्शन पटनाईक यांच्या नावाचा समावेश होता




सुदर्शन पटनाईक यांनी 'प्लास्टिक बॅन करा आणि महासागराला वाचवा' या विषयावर आधारलेले एक सुंदर सॅण्ड आर्ट या महोत्सवात सादर केले. यामध्ये एका पहुडलेल्या माणसाच्या तोंडात मासा आहे, त्या माशाच्या पोटात प्लास्टिकच्या अनेक वस्तू अडकून त्याचा मृत्यू झाल्याचे चित्रित करण्यात आले आहे. तर त्या माशावर एक कासव असून त्यावर 'सेव अस' म्हणजेच 'आम्हाला वाचवा' असे लिहिले आहे.


कलेच्या माध्यमातून जनजागृती करणे आणि ते देखील इतक्या मोठ्या स्तरावर यावरून सुदर्शन यांची महानता कळून येते. त्यामुळे सुदर्शन पटनाईक यांनी असेच देशाचे नाव साता समुद्रापार न्यावे अशी देशवासीयांची इच्छा आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0