'केजीएफ-२' मध्ये संजय दत्त साकारणार 'अधिरा'

29 Jul 2019 12:45:54

 


 


कन्नड
चित्रपट सृष्टीत ब्लॉकबस्टर ठरलेला 'केजीएफ ' या चित्रपटानंतर आज 'केजीएफ ' या त्याच्या सिक्वलमधील नवीन पोस्टर प्रदर्शित झाले. 'केजीएफ ' या चित्रपटाच्या हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि अन्य डब करण्यात आलेल्या भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान आज 'केजीएफ ' मध्ये संजय दत्त 'अधिरा' ही चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे सुप्रसिद्ध कलाकार फरहान अख्तरने आज सोशल मीडियावरून जाहीर केले आणि संजय दत्तच्या भूमिकेची झलक देखील प्रेक्षकांनासमोर आणली.


फरहान अख्तरने त्याच्या लहानपणी संजय दत्तला रॉकी चित्रपटाचे चित्रीकरण करताना पहिले होते त्यानंतर आता अखेर त्याच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मिळत आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले.


 

'केजीएफ ' मध्ये संजय दत्त बरोबरच रविना टंडन आणि प्रशांथ नील हे देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. येत्या नव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0