'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदललेली तारीख कळली का?

29 Jul 2019 15:29:56



परिणिती
चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेल्या 'जबरिया जोडी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक आठवडा पुढे ढकलण्यात आली असून आता चित्रपट ऑगस्टला प्रदर्शित होईल. या पूर्वी ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र त्याच दिवशी खानदानी शाफाखाना आणि फास्ट अँड फ्युरिअस हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत तसाच 'जजमेंटल है क्या' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या नजरेत अजूनही टिकून आहे त्यामुळे चित्रपटाला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा या हेतूने चित्रपटाचे प्रदर्शन लांबवल्याची शक्यता समोर येत आहे.


परिणिती आणि सिद्धार्थ याआधी 'हसी तो फसी' या चित्रपटातून एकत्र झळकले होते आता पुन्हा एकदा त्यांच्यातील केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणारे. उत्तर भारतातील वर अपहरण प्रकारांच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. प्रदर्शनातील विलंबामुळे आता प्रशांत सिंह दिग्दर्शित जबरिया जोडी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी जास्त वाट पाहावी लागणार आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0