गुगल विरोधात गबार्ड यांचा ५ कोटी डॉलरचा दावा

    दिनांक  27-Jul-2019

 

 
 
वॉशिंग्टनः डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून  गबार्ड यांनी गुगलला तब्बल ५ कोटी डॉलर्सची नोटीस बजावली आहे. अडतीस वर्षीय गॅब्बार्ड या अमेरिकी काँग्रेसमधील पहिल्या हिंदू सदस्य असून, त्या इराकविरुद्धच्या युद्धात सहभागी झाल्या होत्या. २०२० मध्ये अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी त्या डेमोक्रॅटिक पक्षाकडून इच्छूक आहेत. जनतेशी मुक्त संवाद साधता यावा यासाठीच्या त्यांच्या हक्कावर गुगलने गदा आणली आणि तांत्रिक अडथळे निर्माण केले या कारणावरून त्यांनी गुगलवर कमीत कमी पाच लाख अमेरिकी डॉलर्सचा दावा केला आहे.
 
 

'गुगलने माझ्यासोबत भेदभाव केला असून माझ्या प्रचारावर गुगलच्या निर्बंधांचा परिणाम झाला आहे.' असं मत गबार्ड यांनी व्यक्त केले आहे. यामुळे गुगल निवडणुका आणि प्रचार यंत्रणांवर प्रभाव पाडू शकते आणि हे अत्यंत धोकादायक आहे असेही त्यांनी सांगितले. 'गुगल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल तर हा निश्चित आमच्या लोकशाहीला धोका आहे.

  

जून महिन्यात पार पडलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या पहिल्या चर्चेनंतर खास प्रचारासाठी सुरू केलेले गब्बार्ड यांचे जाहिरात अकाउंट गुगल कंपनीने अचानक कोणतीही सूचना न देता बंद केले. हे अकाउंट २७ जून ते २८ जून या कालावधीत सहा तासांसाठी बंद करण्यात आले होते. मतदारांशी संपर्क साधण्यात आणि त्यांच्याकडून प्रचारासाठी निधी उभारण्यात त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळेच गॅब्बार्ड यांनी गुगल कंपनीविरोधात दावा ठोकला आहे, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat