बलुचिस्तानमध्ये अतिरेकी हल्ला ; पाकचे १० जवान मृत्युमुखी

    दिनांक  27-Jul-2019
 
 
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वाद चांगलाच चिघळत असताना शनिवारी बलुचिस्तानमध्ये अतिकेरी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन घटनांमध्ये १० पाकिस्तानी सैनिक मारले गेले. दक्षिण वझिरीस्तानमधील गुरबाझमध्ये सीमेवर गस्त घालणाऱ्या सैनिकांवर अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या यात पाकिस्तानचे ६ जवान ठार झाल्याची माहिती आयएसपीआरने दिली.
दुस-या घटनेत, हुशाब आणि तुर्बत यांच्यात संघटित ऑपरेशन दरम्यान फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) बलूचिस्तान सैन्याने दहशतवाद्यांनी गोळीबार केला तेव्हा सशस्त्र बलाचे ४ सैनिक शहीद झाले, असे आयएसपीआरने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या प्रेसमध्ये रिलीज मध्ये म्हटले आहे.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat