भारतीय सुरक्षादलाकडून २ दहशतवाद्यांना कंठस्नान

27 Jul 2019 13:31:18

 

 
श्रीनगर: जम्मू आणि काश्मीर मधील शोपीयाना याठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांपैकी २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षदलाला यश याले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. अजूनही काही दहशतवादी याठिकाणी लपले असून चकमक सुरूच आहे. शोपियान येथील बोना बाझार परिसरातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षादलाच्या जवानांनी आज सकाळी या इमारतीला घेरले. दहशतवाद्यांनी लगेच पोलिसांवर जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराचे चोख प्रत्युत्तर देत सुरक्षादलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यानंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. तसेच या परिसरात अजूनही काही दहशतवादी लपले असून सुरक्षादलाचे शोधकार्य सुरु आहे.
 
 

कुपवाडा मध्ये १ जवान शहिद

पाकिस्तानच्या सीमेपलीकडून होणाऱ्या कुरापती कमी होताना दिसत नाहीत. शनिवारी सकाळी पाकिस्तानच्या कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानने सीमारेषेचे उल्लंघन केले. सीमेपलीकडून झालेल्या फायरिंगमध्ये भारतीय सेनेचे एक जवान शहिद झाले आहेत. ५८ आरआरचे लांस नायक राजेंद्र सिंह अशी त्यांची ओळख सांगण्यात येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0