अलाद्दिन ठरला विल स्मिथचा बिगेस्ट हिट

27 Jul 2019 17:06:57



डिस्नी
या अनिमेशन चित्रपटांमधील एका अग्रगण्य कंपनीचा अलाद्दिन हा चित्रपट २४ मे ला प्रेक्षकांच्या भेटीस आला होता ज्याची चित्रपट गृहांमध्ये अजूनही चलती आहे. या बहुभाषी चित्रपटाने तब्बल अब्ज अमेरिकी डॉलरची कमाई करत एक नवीन विक्रम रचला आहे. आणि त्याचबरोबरीने विल स्मिथचा देखील हा सर्वोत्तम कमाई केलेला चित्रपट ठरला आहे.


विल स्मिथने या चित्रपटात जिनीची भूमिका साकारली होती. या आधी त्याने हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पडली आहेच मात्र 'अलाद्दिन' हा त्याच्या आयुष्यातील एक मैलाचा दगड ठरला आहे यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच विल स्मिथने 'अलाद्दिन' या चित्रपटाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्याच्या चाहत्यांचे आभार मानले होते.


दरम्यान आजच्या या आनंदाच्या बातमीनानंतर विल स्मिथने आपल्या सोशल मीडियावर, हा त्याच्या आयुष्यातील बिगेस्ट हिट असल्याचे जाहीर केले.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0