'बाटला हाऊस' चे नवीन पोस्टर प्रदर्शित

26 Jul 2019 17:32:33



"एन्काऊंटर का मतलब है सर्जिकल स्ट्राईक, मतलब keeping India Safe... फ़रक सिर्फ इतना है कि हमारे बॉर्डर्स शहर के अंदर होते है" असे म्हणत जॉन अब्राहमने बाटला हाऊस या त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. जॉन अब्राहाम हा त्याच्या आगामी चित्रपट 'बाटला हाऊस' मध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट संजीव कुमार यादव या पोलीस कर्मचाऱ्याची मुख्य भूमिका साकारणार आहे.


२००८ साली झालेल्या बाटला हाऊस येथे झालेल्या एन्काउंटरवर आधारित असलेला निखिल अडवाणी दिग्दर्शित 'बाटला हाऊस' चित्रपटात जॉन अब्राहाम बरोबर मृणाल ठाकूर, रवीकिशन, प्रकाश राज, क्रांती प्रकाश झा हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची पटकथा रितेश शाह यांनी लिहिली आहे. साहो, मिशन मंगल या चित्रपटांच्या बरोबरीनेच 'बाटला हाऊस' देखील १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार असल्यामुळे आता प्रेक्षकांचा कल कोणत्या चित्रपटाकडे वळतो हे पाहणे महत्वाचे असेल. तर या पार्श्वभूमीचा बॉक्स ऑफिसवरील परिणाम हा खूप महत्वाचा ठरेल.



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0