पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग

26 Jul 2019 19:22:24



नवी दिल्ली : कारगिल विजय दिनी भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही खणखणीत इशारा दिला. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर आणि अक्साई चीन हे दोन्ही भारताचाच भाग असल्याचे शुक्रवारी त्यांनी सांगितले. याबाबत राजकीय नेतृत्वाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यासाठी कूटनीतीचा मार्ग अवलंबवावा किंवा इतर कोणताही मार्ग, पण ते भाग परत भारतात आणा, अशी सूचनाच बिपीन रावत यांनी केली.

 

रावत यांनी कारगिल विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी द्रासमध्ये कारगिल वॉर मेमोरियलवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी बंदुकधार्‍या काश्मिरी तरुणांनाही इशारा दिला. ते म्हणाले, "काश्मीरमध्ये जर तुम्ही सेनेविरोधात बंदूक वापरली, तर तुम्ही कब्रस्थानात जाल आणि तुमची बंदूक आमच्याकडे येईल. काश्मिरी तरुणांनी चांगला मार्ग अवलंबवावा आणि रोजगाराच्या दृष्टीने पुढची पावले उचलावीत." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0