धोनी काश्मीर सीमेवर करणार रक्षण

    दिनांक  25-Jul-2019नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग काश्मीरमध्ये करण्यात आली आहे. पेट्रोलिंग(गस्त), गार्ड, पोस्ट ड्युटी यांसारखी जबाबदारी तो सांभाळणार असल्याची माहिती भारतीय लष्कराकडून गुरूवारी देण्यात आली आहे.

 

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात लेफ्टनंट कर्नल धोनी १०६ टी.ए.बटालियनमध्ये सामील होणार आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग असलेल्या या युनिटची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात असणार आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार आणि लष्कर मुख्यालयाकडून मिळालेल्या मान्यतेनंतर धोनी पेट्रोलिंग(गस्त) गार्ड आणि पोस्ट ड्युटी यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळेल आणि सैनिकांसोबतच राहणार आहे.

 

पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असलेल्या धोनीला लष्कराने लेफ्टनंट कर्नलपद दिले होते. २०११ सालीच लष्कराने त्याला हा सन्मान दिला. अभिनव बिंद्रा आणि दीपक रावसोबत धोनीला हे पद देण्यात आले होते. २०१५ साली धोनीने आग्रा येथे पॅराशूट जंपिंगचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. पॅराशूट रेजिमेंट लष्कराची स्पेशल फोर्स आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat