पालघरमध्ये भूकंपाचे धक्के

    दिनांक  25-Jul-2019पालघर : मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे सौम्य धक्के पालघरमध्ये बसत आहेत. गुरुवारी पहाटे डहाणू, तलासरी तालुक्याबरोबर पालघरमधील काही भाग आणि गुजरातच्या उंबरगावपर्यंतचा भाग भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. पहाटे १.१५ च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता ही ३.८ रिश्टर स्केल होती अशी माहिती आयएमडीने दिली.

 

जिल्ह्यात रात्री ९.४९ वाजता २.४ रिश्टर स्केल, १२.३३ वाजता २.२ रिश्टर स्केल, १२.३६ वाजता १.९ रिश्टर स्केल तर १.०३ वाजता ३.८ रिश्टर स्केल त्यानंतर पुन्हा १.०६ वाजत आणि १.१२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. धुंदलवाडी, दापचरी, तलासरी, बोर्डी, डहाणू, बोईसर, कासा, झाईपासून संपूर्ण परिसर हादरला. तासाभरात किमान ७ ते ८ भूकंपचे धक्के जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली. डिसेंबर, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातही पालघर परिसरात भूंकप झाला होता. त्यामुळे पालघर परिसरात भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat