कसोटीमध्ये टीम 'इंडिया'च अव्वल नंबरी

    दिनांक  24-Jul-2019नवी दिल्ली : विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यामध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखावेल अशी आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताने आपले अव्वल स्थान राखले आहे. तसेच, कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमावरीमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर चेतेश्वर पुजारा हा तिसऱ्या स्थानावर आहे.

 

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराटचे ९२२, केन विल्यमसनचे ९१३ तर चेतेश्वर पुजाराचे ८८१ गुण आहेत. गोलंदाजांच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा सहाव्या आणि आर.अश्विन दहाव्या क्रमांकावर आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat