केंद्र सरकार घेणार आरक्षणाचा आढावा

24 Jul 2019 11:28:09

 

 
वी दिल्ली: सरकारी नोकरीसह शैक्षणिक व इतर ठिकाणी मिळणाऱ्या आरक्षणाचा केंद्र सरकारकडून आढावा घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती सामाजिक न्याय आणि विकास राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. इतर मागासवर्गीय व एससी प्रवर्गातील काही जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो का? तसेच काही लोक वारंवार स्थलांतर करतात. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. परंतु त्यांच्या मूळ राज्यातील लाभ व केंद्र सरकारच्या सवलती त्यांना लागू होतात,असे कटारिया यांनी सांगितले.
 
 

लोकसभेत प्रश्न उत्तराच्या तासाला भाजप आमदार कुमार निशाद यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना कटारिया यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'एससी आणि ओबीसींच्या जातप्रमाणपत्रांची पडताळणी करणाऱ्या विभागांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.'

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0