'ट्रॉमा केअर सेंटर'मध्ये' अंधत्व आलेल्यांना न्याय द्या !

24 Jul 2019 16:45:43


भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांची मागणी


मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर या जोगेश्वरी येथील रुग्णालयात डोळ्यांवर उपचार करून घेताना अंधत्व आलेल्यांना न्याय द्या, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी स्थायी समितीत केली.पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी येथे आजगावकर मैदानात असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात जानेवारी रोजी सात जणांचे डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले. त्यापैकी पाचजणांची दृष्टी कमकुवत झाली, तर दोघांना पूर्ण अंधत्व आले. अभिजीत सामंत यांनीच हे प्रकरण स्थायी समितीसमोर आणले होते.

 

चौकशीअंती शिपायाकडून असिस्टंटचे काम करून घेतल्याने जंतुसंसर्गामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. त्यांतर रुग्णालयाचे अधीक्षक बावा यांची बदली करण्यात आली, तर दोष नसतानाही शिपायाला दुसरीकडे पाठविण्यात आले. पण ज्यांच्या आयुष्याचे नुकसान झाले त्यांना काहीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

 

अंधत्व आलेले टेम्पोचालक आणि रिक्षाचालक आहेत. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने आणि तेच कुटुंबप्रमुख असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अंधत्व आलेल्या त्या दोघांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सामंत यांनी केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0