मनपा-नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू...

23 Jul 2019 15:08:59

 

 
मुंबई : महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे २ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.
 

राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत होती. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबरपासून महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मान्यता देण्यात आली आहे.

 

सातवा वेतन लागू झाल्याने मनपा आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे या निर्णयाचे कर्मचारी वर्गातून आनंद व्यक्त आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0