नवी दिल्ली : देशातील रस्त्यांवर आता विमानातील सोयी देता येतील, अशा पर्यायी इंधनावर धावणारी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या सार्वजनिक वाहनांमध्ये उच्च प्रतिची सेवा सर्वसामान्यांना परवडेल, अशा दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संदर्भात मोटार वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ संसदेत सादर केले जाणार आहे.
केंद्रीय रस्ते परिवाहन राजमार्ग नितीन गडकरी हे या संबंधिचे विधेयक सादर करतील. डबल-डेकर बसमध्ये विमानाप्रमाणे सोयी सुविधा उपलब्ध असणार आहेत. पर्यायी इंधनावर सुरू असणाऱ्या या बसेसमुळे महापालिका क्षेत्र व अन्य उपक्रमातील खर्च वाचू शकेल, अशी आशा सरकारला वाटत आहे.
गडकरी म्हणाले, "अशा बस सुरू झाल्यानंतर खासगी वाहनांतून होणाऱ्या प्रवासाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसेल. तसेच पर्यायी इंधनाच्या वापरामुळे प्रदूषण कमी होईल.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रस्तावित मोटार वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ अंतर्गत राष्ट्रीय वाहतूक धोरणाचीही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मध्यस्तीने वाहतूक व दळणवळण व्यवस्था अत्याधूनिक आणि कुशल करण्याचा विचार केला जात आहे." केंद्र सरकारतर्फे या अंतर्गत विदेशी गुंतवणूकीची सहाय्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat