'साहो' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

23 Jul 2019 13:11:56



साहो
चित्रपट त्याच्या बदललेल्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे आधीच चर्चेत होता आणि आता त्याचे आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यातील जबरदस्त केमेस्ट्री दाखवणारे हे पोस्टर आज प्रदर्शित झाले.


अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असलेल्या 'मिशन मंगल' आणि जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' या चित्रपटांशी टक्कर होत असलेल्या 'साहो' चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाची तारीख ३० ऑगस्ट केल्यानंतर माध्यमांमधील चर्चा सुरु ठेवण्यासाठी या पोस्टरचा चांगला उपयोग होणार आहे.


प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यासह जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, अरुण विजय, मुरली शर्मा असे नावाजलेले कलाकार देखील या चित्रपटाच्या माध्यमातून झळकणार आहेत.




माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0