'हो माझा 'तो' निर्णय चुकीचाच, पण...' - पंच धर्मसेना

    दिनांक  22-Jul-2019नवी दिल्ली : विश्वचषक २०१९ हा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. अशीच एक चर्चा म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये पंच कुमार धर्मसेना यांनी ओव्हरथ्रोच्या दिलेल्या ६ धावा. अखेर यांच्यावर पंच कुमार धर्मसेना यांनी भाष्य केले आहे. 'माझा निर्णय चुकीचा असला तरी मला त्याचा खेड वाटत नाही.' असे त्यांनी सांगितले.

 

"टीव्हीवर रिप्ले पाहून माझी चूक काढणे खूपच सोपे आहे. मीदेखील नंतर रिप्ले बघितला तेव्हा माझी चूक कळली. ती मी मान्य करतो; पण आम्हा मैदानातल्या पंचांना टीव्ही रिप्ले बघून निर्णय देण्याची चंगळ नसते. मला माझ्या निर्णयाचा खेद नाही. उलट माझ्या कामगिरीचे आयसीसीने कौतुकच केले.", असे पंच कुमार धर्मसेना सांगतात.

 

क्रिकेटच्या नियमानुसार त्यावेळी पंचांनी सहाऐवजी पाच धावा देणे अपेक्षित होते. कारण गप्टिलने थ्रोची कृती केली, त्यावेळी स्टोक्स आणि रशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण त्या दोघांनी दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण केलेली एक धाव आणि ओव्हरथ्रोच्या चार अशा मिळून पाच धावा द्यायला हव्या होत्या. परंतु पंच कुमार धर्मसेना यांच्या चुकीमुळे इंग्लंडला एक धाव अधिक मिळाली. याचा इंग्लंडला फायदा मिळाला आणि सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये गेला.

 

काय आहे आयसीसीचा नियम?

 

आयसीसीच्या नियम १९.८ नुसार, जर क्षेत्ररक्षकाचा ओव्हरथ्रो किंवा आणखी कोणत्या कारणाने चेंडू सीमारेषा पार गेल्यास संघाला..

 

- पेनल्टीच्या धावा

- चौकाराच्या धावा

- थ्रो करेपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केलेल्या धावा

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat