लॅपटॉपमधून निघाला धूर, दुरुस्ती करणाऱ्याला मारहाण

    दिनांक  22-Jul-2019


 


रत्नागिरी : दुरुस्तीला दिलेल्या लॅपटॉपमधून धूर निघाल्याने त्या बदली नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याची मागणी बेदम चोप दिल्याची घटना खेड येथील इलेक्ट्रोनिक्स दुकानात घडली आहे. उपेंद्र घोडे, असे दुकानमालकाचे नाव आहे. दरम्यान, सुलतान झारी व मुनाफ झारी यांच्याविरोधात मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

झारी बंधूंनी उपेंद्र यांच्याकडे त्यांचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी दिला होता. लॅपटॉप कंपनी सुटे भाग मिळत नसल्याने दुरुस्ती अशक्य असल्याचे दुकानमालकाने सांगितले. त्यामुळे लॅपटॉप पुन्हा घेऊन जाण्याची विनंती दोन्ही भावांना त्यांनी केली. मात्र, तो दुरुस्त करून द्यावा, असा आग्रह झारी यांनी केला.

 

दुकानमालकाने शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांच्यासमोरच लॅपटॉपची दुरुस्ती सुरू केली. त्यावेळी अचानक लॅपटॉपमधून धूर येऊ लागला. या प्रकाराने संतापलेल्या झारी यांनी दुकानमालकांना नुकसानपोटी पाच हजारांची मागणी करत मारहाण केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat