उस्मानाबादमध्ये रंगणार ९३ वे साहित्य संमेलन

22 Jul 2019 13:03:17


 

 
औरंगाबाद: ९३ वे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार असल्यासाचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या तारखाही संयोजकांशी चर्चा करून लवकरच ठरवण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

संमेलनाचे यजमानपद मिळावे याकरिता मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेकडून त्यासाठी मागील चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यंदाच्या वर्षी यासाठी संमेलनस्थळ, निवास आणि भोजन व्यवस्था, वाहनतळ आणि इतर महत्वपूर्ण सुविधा त्याचबरोबर उस्मानाबाद दर्शन अशी जोरदार तयारी करण्यात आली आहे. जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडे एकुण चार प्रस्ताव आले होते. त्यापैकी लातूर आणि बुलढाणा या दोन प्रस्तावांना बाजूला ठेवत महामंडळाने नाशिक आणि उस्मानाबाद या दोन ठिकाणच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवली होती. संमेलनासाठी आवश्यक असणार्‍या सर्व बाबींची विस्तृत तयारी करण्यात आली आहे.

 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
Powered By Sangraha 9.0