आसाममधील पूरग्रस्त भागात स्वयंसेवकांचे मदतकार्य !

20 Jul 2019 12:48:38


 


गुवाहाटी : नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावरील कोणतेही संकट असो या काळात रा. स्व. संघ व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदतीला धावून येत असतात. संकटकाळी रा. स्व. संघ मदतीला धावून आल्याची अनेक उदाहरणे देशाने पहिली आहेत. असेच एक उदाहरण सध्या आसाममध्ये पाहायला मिळत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारतीचे स्वयंसेवक आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. संघाच्या स्वयंसेवकांतर्फे पूरग्रस्तांना अन्न, पाण्यासह इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठीही स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती विश्व संवाद केंद्राने दिली.


आसामच्या २८ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून तब्बल ३० लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने ३२७ केंद्र उभारले आहेत. यात १६ हजार ५९६ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. ज्यांना मदत मिळाली नाही अशा ठिकाणी जाऊन स्वयंसेवक त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. नलबारी आणि दारंग येथे कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांचे फोटो विश्व संवाद केंद्राने शेअर केले आहेत. त्यामुळे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे निस्वार्थी भावनेने देशवासीयांच्या मदतीला धावून आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0