कल्याणमध्ये भिंत कोसळून तीन ठार

    दिनांक  02-Jul-2019


 


कल्याण : घाटकोपर आणि पुणे येथे भिंत कोसळून दुर्घटना घडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुर्गाडी किल्ल्या लगत असलेल्या 'नॅशनल् ऊर्दू स्कुल'ची संरक्षक भिंत घरावर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या '' प्रभागाक्षेत्रातील रामबाग येथील फातिमा मंजिल इमारतीचा धोकादायक भाग दुपारी कोसळल्याने आप्तकालीन यंत्रणेने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही धोकादायक इमारत पाडण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. जखमींना रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल केले असून अग्निशमन दलाचे जवान व आप्तकालीन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव सुरू केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat