शेअर बाजाराला सुट्टी नाही : व्यवहार सुरळीत सुरू

    दिनांक  02-Jul-2019


 

मुंबई : मुंबईकरांची दैना उडवणाऱ्या पावसामुळे अनेक खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये, महाविद्यालये, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुंबई शेअर बाजारातील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहीती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी दिली आहे.

 

मुंबईत वाहतूक व्यवस्था, लोकल आणि इतर दळणवळणाच्या व्यवस्था कोलमडली असून अनेक खासगी कंपन्यांही बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचे सर्व व्यवहार नियोजित वेळेनुसार, सुरू असल्याची माहीती यावेळी देण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat