आयटीआयमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी होणार

02 Jul 2019 16:54:51



कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची विधानसभेत माहिती


मुंबई : राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये (आयटीआय) झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज विधानसभेत दिली. आवश्यकता नसतानाही बऱ्याच आयटीआयमध्ये ५० कोटींचे टूल्स खरेदी तसेच अन्य बाबीतही भ्रष्टाचार झाला असल्याबाबत आ. नागो गाणार व प्रा.अनिल सोले यांनी प्रश्न विचारला, त्यास उत्तर देताना पाटील यांनी ही माहिती दिली.

 

१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठित करण्यात आली होती. आता या प्रकरणातील चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) सोपविण्यात येत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत अहवाल प्राप्त करून यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पाटील-निलंगेकर यांनी यावेळी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0