आदित्य ठाकरे म्हणतात... ही आपत्कालीन स्थिती, पालिकेला दोष देऊ नका !

    दिनांक  02-Jul-2019


 


मुंबई : मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबले नाही तर पाणी साचले, अशी प्रतिक्रीया सोमवारी दिल्यानंतर सर्वसामान्यांनी याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी पाणी साचल्याचा फटका खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही बसला. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात पोहोचण्यात त्यांना उशीर झाला. आदित्य ठाकरे यांनी उशीरा का होईना, आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.

 

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पूरस्थितीचा आढावा घेतला. आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका प्रशासन विभागाला त्यांनी दिले. दरम्यान, त्यांनी पालिकेची पाठराखण करत ही स्थिती आपत्कालीन स्थिती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियामध्येही अशाप्रकारे पूरस्थिती आल्यास सर्व व्यवस्था फोल ठरते, असे उदाहरण त्यांनी दिले. पालिका फोल ठरली नसून हा वातावरणातील बदल असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

वांद्रे भागांत यंदा पहिल्यांदाच पाणी साचल्याने आतातरी पाणी तुंबले म्हणायचे का असा संतप्त सवाल सोशल मीडियाद्वारे महापौरांना विचारला आहे. आणखी दोन दिवस पाऊस जोरदार पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असल्याचे गरज असल्यास बाहेर पडा, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat