गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांना ‘स्वामीभूषण’ राज्य पुरस्कार प्रदान

19 Jul 2019 15:28:14



ख्यातनाम
गायिका आशा भोसले यांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्यास्वामीरत्नराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी याला देखीलस्वामीभूषणराज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले आणि अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘स्वामीरत्नराष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये रोख, सन्मानचित्र सन्मानपत्र असे असून राज्यस्तरीय 'स्वामीभूषण' पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे आहे.


या राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पं. ह्दयनाथ मंगेशकर होते. या समितीवर ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, संयोजक अनुषा अय्यर यांचाही समावेश आहे. गुरूपौर्णिमा तथा अन्नछत्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी धर्मसंकीर्तन तथा सांस्कृतिक संगीत सोहळ्याचेही आयोजन केले जाते. यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांसह नामवंत कलावंत मंडळी सहभागी होतात, अशी माहिती जन्मेंजयराजे भोसले यांनी दिली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0