कुमारस्वामी सरकारची आज 'ठराव' परीक्षा

18 Jul 2019 10:42:04


 


बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्नाटक नाट्याला गुरुवारी विराम मिळण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार गुरुवारी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. १५ आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर कुमारस्वामी सरकारची नाव बुडणार की तरणार हे आज विश्वासदर्शक ठरावानंतरच स्पष्ट होणार.

 
अधिक माहितीसाठी जरूर वाचा...
 
 कर्नाटकात कुमारस्वामी सरकार कोसळणार ?
 

राज्यातील सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत ११७ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे ७८ तर जेडीएसचे ३७, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. २२५ सदस्य असलेल्या विधासभेत भाजपकडे दोन अपक्ष आमदारांसह १०७ जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या १५ आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0