कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

    दिनांक  17-Jul-2019मुंबई : विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. मात्र ही निवड बीसीसीआयने घातलेल्या अटींवर होणार आहे. तसेच रवी शास्त्रींच्या निवडीवरही शंका व्यक्त करण्यात येत आहे.

 

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री व्यतिरिक्त गॅरी कर्स्टन, टॉम मुडी यांची नावे असण्याची शक्यता आहे. अयशस्वी आयसीसी विश्वचषक मोहिम आणि सपोर्ट स्टाफसह भारतीय क्रिकेट संघाची सध्याची रचना यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. भारताच्या विंडीज दौऱ्यानंतर रवी शास्त्रींचा करार संपणार आहे. त्यामुळे प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयने शोधाशोध सुरु केली आहे.

 

भारतीय संघाने २८ वर्षानंतर विश्वचषक मोहोर उठवली. या विजयामागे दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांचा मोठा हात होता. त्यांचे वय ५१ वर्षे आहे. सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी हेदेखील भारताच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मूडी ५३ वर्षांचे आहेत.

 

काय आहेत अटी ?

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किमान २ वर्षे अनुभव आणि ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेली असलेली व्यक्तीच प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरू शकणार आहे. मुख्य प्रशिक्षकांसह फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर आणि प्रशासकीय व्यवस्थापक या सर्वांसाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागवले आहेत. आणि हा अर्ज भरण्यासाठी ३० जुलैच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat