'गर्लफ्रेंड' चित्रपटातील 'कोडे,सोपे थोडे' गाणे प्रदर्शित

    दिनांक  16-Jul-2019अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'गर्लफ्रेंड' या चित्रपटातील 'कोडे,सोपे थोडे' हे आणखी एक रोमँटिक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन आणि संयोजन ह्रिषीकेश, सौरभ आणि जसराज यांनी केले असून श्रुती आठवले यांनी हे गाणे गायले आहे तर क्षितिज पटवर्धन यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

उपेंद्र सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' या चित्रपटामधील गीतकार क्षितीज पटवर्धन यांच्या गीतांना श्याल्मली खोलगडे, श्रुती आठवले, जसराज जोशी यांचा आवाज लाभला आहे. ‘‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंडया गाण्याने सोशल मिडीयावर धमाल उडवल्यानंतर वेस्टर्न म्युझिकचा तडका असलेल्या लव्ह स्टोरीया गाण्यातून सई आणि अमेय यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना दिसली तर नुकतेच आलेले कोडे सोपे थोडे, अवघड थोडे पडले का रेहे गाणे नचिकेत आणि अलिशाच्या नात्याबद्दलची उत्कंठा निर्माण करणारे आहे.

गर्लफ्रेंडचित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, रसिका सुनील, ईशा केसकर, कविता लाड, यतीन कार्येकर, तेजस बर्वे, सुयोग गोऱ्हे, उदय नेने यांच्या भूमिका आहेत. एखादा इंट्रोव्हर्ट मुलगा गर्लफ्रेंडच्या शोधात असेल तर काय गंमती-जमती घडतात याचा मनोरंजक प्रवास असलेला गर्लफ्रेंडहा चित्रपट येत्या २६ जुलै पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat