चंद्रकांतदादा पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

    दिनांक  16-Jul-2019
 

मंगल प्रभात लोढा मुंबई अध्यक्षपदी

 
 

मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोपवला आहे. तर, मुंबई महानगर प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवली आहे. ही नियुक्ती मंगळवारपासून लागू झाल्याची माहीती भाजपचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी दिली.

 

खासदार रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. लोकसभेवर निवडून गेल्यावर दानवे यांच्याऐवजी भाजपला महाराष्ट्रावर पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार, या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

 

आमदार अॅड. आशिष शेलार यांच्यावर शालेय शिक्षण व क्रीडामंत्री खाते सोपवल्यानंतर आता मुंबई अध्यक्षपदावर आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप मुख्यालयात अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली घोषणा करण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat