'इको सपोर्ट'ला लाभलेला गुरुरुपी आईचा 'सपोर्ट'

    दिनांक  16-Jul-2019'इको सपोर्ट प्रा. लिमिटेड' या पर्यावरणीय क्षेत्रात विविध पातळीवर काम करणार्‍या अग्रगण्य कंपनीबरोबरच, त्या कंपनीचे संचालक निरंजन कोळेकर आणि प्राची निमकर या दाम्पत्याच्या मातृरुपी प्रेरणास्थानाला वंदन करणारा हा लेख...

 

रंजन कोळेकर हे 'सीएसआयआर-एनईईआरआय-निरी'चे (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी २००८ मध्ये मुंबई विद्यापीठातून जैवविज्ञान विषयामध्ये 'मास्टर्स' पदवी मिळवली. ते भारतीय गुणवत्ता परिषदेद्वारे जलप्रदूषणातील कार्यात्मक क्षेत्रतज्ज्ञ म्हणून 'एनएबीईटी' मान्यताप्राप्त आहेत. निरंजन यांची फिक्की-स्टॅनफोर्ड बिझनेसद्वारे 'डीएसटी-लॉकहीड मार्टिन इंडिया इनोव्हेशन ग्रोथ प्रोग्राम २०१४' मध्ये सरोवर जैवउपाययोजनांसाठीही निवड झाली होती.

 

प्राची निमकर यांनी मुंबई विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये विशेष प्राविण्यासह 'लाइफ सायन्सेस'मध्ये 'मास्टर्स' पदवी प्राप्त केली आहे. पर्यावरणशास्त्र आणि जैवविविधतेतील कार्यात्मक क्षेत्रतज्ज्ञ म्हणून त्यांना भारतीय गुणवत्ता परिषदेद्वारे 'एनएबीईटी' मान्यता देण्यात आली आहे. निरंजन कोळेकर आणि प्राची निमकर या दोघांचीही सुरुवात 'सीएसआयआर- एनईईआरई'मध्येच झाली. ते राज्य पातळीवरील जल लेखापरीक्षण, पाणथळ प्रदेशांची रचना, 'ईआयएम'च्या आंतरराष्ट्रीय तेलगळती आणि क्षेत्रीय लँडफिल सुविधेमध्ये सहभागी होते.
 

'एनईईआरआय'च्या यशस्वी कार्यकाळानंतर, दोघांनी एकत्रितपणे २०१४ मध्ये 'इको सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'ची स्थापना केली. तेव्हापासून 'इको सपोर्ट'ने घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्रकल्पांसाठी पर्यावरण मंजुरी, टोलेजंग इमारतींसाठीची मंजुरी, ग्रीन ब्रॅंण्डिंग प्रकल्प, ग्रीन स्पेस व्यवस्थापन, पर्जन्य जलसाठवणी, तलावाचे जैवविश्लेषण आणि इतर पर्यावरणीय तंत्रज्ञान यांसारख्या विविध विभागांमध्ये काम केले आहे. युवा तंत्रकुशल कर्मचारीवर्ग आणि त्यांना पर्यावरण क्षेत्रातील प्रतिष्ठित सल्लागारांच्या मिळणार्‍या सखोल मार्गदर्शनाच्या जोरावर 'इको सपोर्ट प्रा. लि.' उच्चस्तरीय वैज्ञानिक सचोटी आणि बांधिलकीच्या मूल्यांवर कार्यरत आहे.

 

निरंजन कोळेकर हे सध्या तंत्रज्ञान विभागात प्रमुख म्हणून कार्यरत असून देशभरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. कोकणपासून ते अगदी मेट्रो शहरांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात गेल्या दशकभरापासून ते कार्यरत आहेत. ग्राहकांच्या व्यावसायिक उन्नतीसाठी पर्यावरणीय मंजुरी आणि नाविन्यपूर्ण, टिकाऊ कचरा व्यवस्थापन पद्धतींची अंमलबजावणीसाठी 'इको सपोर्ट' टीमचे ते यशस्वीरित्या नेतृत्व करीत आहेत. तसेच गाव पातळीवरील घनकचरा मूल्यांकन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्येही ते सक्रियपणे सहभागी आहेत.

 

महाराष्ट्र आणि गोव्यामधील विविध विकास प्रकल्पांकरिता पर्यावरणीय मंजुरीसह 'ईआयए'वर, एक दशकापेक्षा जास्त अनुभव प्राची यांच्या गाठीशी आहे. खासकरुन मुंबईचा विचार करता, बांधकाम आणि त्यासंबंधित क्षेत्रांतून निर्माण होणार्‍या कचरा व्यवस्थापनाच्या धोरण निश्चितमध्येही प्राची सहभागी होत्या. सध्या 'इको सपोर्ट'मध्ये प्राची विकेंद्रीकृत सेंद्रिय कचरा कंपोस्टिंगसाठी व्यवसाय विकासात गुंतलेल्या आहेत आणि मुंबईच्या शहरी इमारतींमध्ये पर्यावरणीय पायाभूत सुविधांसाठी असलेल्या विभागामध्ये प्रमुख आहेत. टोलेजंग इमारतींच्या पर्यावरणीय मंजुरीचा (एचआरसी) अनुभवही प्राची यांना आहे. बांधकाम (रिअल इस्टेट) प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर प्राची यांनी कार्य केले आहे. पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (ईआयए) आणि सूर्यप्रकाश, नैसर्गिक वायुविजन, सावली आणि वारा विश्लेषणसारख्या पर्यावरणीय प्रकल्पांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

 

आता 'इको सपोर्ट'मध्ये २० पेक्षा जास्त लोकांची एक टीम आहे, जी पर्यावरणाच्या सुधारणेसाठी सतत प्रयत्नशील आहे. 'इको सपोर्ट'ने आतापर्यंत पर्यावरण मंजुरी आणि देखरेख, घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात दीडशेपेक्षा जास्त प्रकल्प देशभरात यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या प्रवासात 'इको सपोर्ट'ने अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास, टाटा, भारतीय वन्यजीव संस्था इत्यादींसारख्या प्रतिष्ठित ग्राहकांना सेवा दिली आहे.

 

आज गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर निरंजन यांच्या मातोश्री आरती कोळेकर यांचेही निरंजन आणि प्राची यांनी मनस्वी आभारी मानले आहेत. प्राची म्हणतात, "त्यांची समर्पणवृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. अगदी कठीण परिस्थितीत, जेव्हा आम्ही आमच्या स्वप्नांमागे धावत होतो, तेव्हा नेहमीच आईंनी आम्हाला पाठिंबा दिला आहे."

 

(निरंजन कोळेकर आणि प्राची निमकर हे 'इको सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'चे संचालक आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat