गुरु कृपा ही केवलम्...

    दिनांक  16-Jul-2019बायोमलीकंपनीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे (एसडब्ल्यूएम) विक्री प्रमुख सुभेंदू मंडल यांनी त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीबरोबरच, प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी त्यांना लाभलेल्या गुरुंच्या मार्गदर्शनासंबंधी व्यक्त केलेले हे मनोगत...

 

चांगल्या समाजस्वाथ्यासाठी स्वच्छ आणि हरित पर्यावरणनेहमीच अपेक्षित असते आणि त्याचे कौतुकही केले जाते. परंतु, त्यासाठी पुढाकार घेणे हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि मी स्वतःला या गटातील मानतो. माझ्या या पर्यावरणप्रेमाच्या प्रेरणेचे मूळ स्रोत म्हणजे माझे बाबा. कारण, त्यांच्याबरोबरच मी अगदी लहानपणापासूनच एका सुंदर बागेची देखभाल करत होतो. ओडिशातील स्टील सिटीम्हणून ओळखले जाणारे रुरकेला, जे अजूनही एक नियोजित, स्वच्छ आणि हरित शहर मानले जाते, तेथे माझा जन्म झाला, मी लहानाचा मोठा झालो. माझ्या लग्नानंतर टाटा स्टील शहर, जे चांगल्या आणि निरोगी पर्यावरणाबाबत स्वयंसिद्ध आहे, अशा शहराशी संबंध जोडला गेल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान मानतो.

माझ्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात कापड उद्योगापासून झाली, नंतर बाजारातील कल पाहता मी प्लास्टिककडे वळलो आणि नंतर महानगरपालिकेसाठी कचरा डबे (चाके असलेले डबे) विक्रीशी जोडला जाण्याची संधी मिळाली, ज्यामुळे निरोगी पर्यावरणाकरिता स्वच्छतेच्या दिशेने माझ्याकरिता मार्ग खुले झाले. हळूहळू या व्यवस्थेमध्ये गुंतत गेलो आणि जैविक कचरा प्रक्रियेची प्रणाली आणि घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत सॅनिटरी कचरा, पुनर्वापरायोग्य कचरा यावरील प्रक्रिया याकरिता अद्ययावत प्रणाली आणि तंत्रज्ञानाबाबत मी स्वत:ला प्रशिक्षित केले. माझ्या या प्रवासादरम्यान, प्रत्येक टप्प्यात माझे अनेक शुभचिंतक विशेषत: शरद पारेख (व्यवस्थापकीय संचालक - नीलकमल प्लास्टिक्स लिमिटेड), बी. पी. पाटील (माजी उप महापालिका आयुक्त-बृहन्मुंबई महानगरपालिका) आणि इतर बर्‍याच लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले.

सध्या घनकचरा व्यवस्थापनामधील या सर्व अनुभवांसह, गेल्या ४० वर्षांपासून पर्यावरणात्मक अभियांत्रिकीमधील अग्रगण्य मानल्या जाणार्‍या अशा नेटेल इंडिया लिमिटेडशी (अ नेटेरवाला ग्रुप कंपनी) जोडले जाण्याची संधी मला मिळाली आहे. घनकचराव्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश केल्यापासून फारच कमी कालावधीत आम्ही स्वतःला उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि सेवेसह सर्वात विश्वासार्ह ब्रॅण्ड म्हणून स्थापित केले आहे. आम्ही एरोबिक - पूर्णतः ऑटोमेटिक ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीनच्या बायोमलीश्रेणीसह एरोबिक तंत्रज्ञान आणि बायोगॅस प्लांट्सद्वारे जैविक कचर्‍यावर प्रक्रियेकरिता आणि खाजगी व सरकारी विभाग, दोन्हीमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि बायोशुद्धी अंतर्गत विल्हेवाट व्यवस्था बसविणे, याकरिता संपूर्ण देशभरात विभागवार आमचे पंख पसरण्यास सुरुवात केली आहे. आम्ही एनजीओमार्फत सीएसआर-फंडिंगअंतर्गतदेखील काही प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आणि काही प्रकल्प प्रक्रियेमध्ये आहेत.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या देशास प्रदूषणमुक्त पर्यावरण प्रदान करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आमच्या टीमला बळकट करण्यासाठी व्ही. एम. शानबाग, जोस विन्सेंट गोम्स यांच्या देखरेखीअंतर्गत आणि फिरोज कटिला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अधिक अनुभवी व्यक्ती आणि गटांशी हळूहळू जोडले जात आहोत आणि शानबाग यांनाच मी गुरुस्थानी मानतो.

मी आज जो काही आहे, तो माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरील माझ्या गुरूंच्या शुभेच्छांमुळेच आणि जे काही साध्य करू शकलो. कारण, गुरु कृपा ही केवलम्।

 

- सुभेंदू मंडल

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat