आयकर भरताना चुकीचा आधार क्रमांक दिल्यास १० हजारांचा दंड

    दिनांक  15-Jul-2019


 


नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्पात आयकर भरताना पॅनकार्ड नसल्यास आधार क्रमांक लागू करण्याबद्दलची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पॅनकार्ड नसेल आणि चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दहा हजारांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकार या संबंधित प्रस्ताव लागू करण्याच्या विचारात आहे.

 

१ सप्टेंबरपासून लागू होणार कायदा

आयकर अधिनियम २७२ ब यानुसार, पॅनकार्डच्या वापरासंदर्भात नियमांच्या उल्लंघनावर दंडात्मक कारवाईचा पर्याय आहे. अशाच प्रकारे आधार क्रमांकाबद्दल चुकीची माहीती भरल्यास १० हजारांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दरम्यान, दंड आकारण्यापूर्वी करदात्याला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास हा दंड आकारला जाऊ शकतो.

 

देशभरातील १२० कोटी जनतेकडे आहे 'आधार'

देशभरातील तब्बल १२० कोटी जनतेकडे आधार कार्ड आहे, त्यापैकी केवळ २२ कोटी लोकांकडे पॅनकार्ड आहे. करदाते पॅनकार्ड नसल्यास आधार क्रमांकानेही आयकर भरू शकता. बॅंक खाते सुरू करण्यासाठी, क्रेडिट, डेबिट कार्डसाठी आधार क्रमांक वापरण्यात येतो.

 

१८ सेवांसाठी पॅन ऐवजी आधारचा पर्याय

५ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर एकूण १८ प्रकारच्या सुविधांसाठी पॅनकार्डऐवजी आधार क्रमांक वापरला जाऊ शकतो. त्यानंतर आता विविध १८ प्रकारच्या सेवांसाठी आधार क्रमांक वापरला जाऊ शकतो. मात्र, तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर तुम्हाला पॅन क्रमांक अनिवार्य आहे.

 

आधार क्रमांक दिल्यानंतर मिळणार पॅन क्रमांक

आधार क्रमांक दिल्यानंतर आयकर विभागाकडून त्या व्यक्तीला पॅनकार्ड क्रमांक दिला जाणार आहे. तुम्ही आधार क्रमांक टाकून पॅनकार्डसाठी अर्ज केल्यास लगेचच तुम्हाला पॅन क्रमांक मिळेल.

 

या ठिकाणी मात्र पॅनकार्ड आवश्यक

· मोटार वाहन खरेदी-विक्री करण्यासाठी बॅंक खाते (जन-धन खाते वगळता) सुरू करण्यासाठी

· क्रेडिट, डेबिट कार्टसाठी अर्ज देण्यासाठी

· डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी

· हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये ५० हजारांहून एक पेक्षा अधिक बिल भरणा करण्यासाठी

· ५० जास्त मुल्य असलेले विदेशी चलन खरेदी करण्यासाठी

· ५० हजारांहून अधिक रक्कमेचे रोखे खरेदी करण्यासाठी

· बॅंकेत ५० हजारांहून जास्त रक्कमेचा डीडी बनवण्यासाठी

· पोस्ट ऑफिसमध्ये ५ लाखांहून जास्त रक्कम भरणा करण्यासाठी

· विमा पॉलीसीत ५० हजारांहून जास्त रक्कम जमा करण्यासाठी

· शेअर खरेदी करताना १ लाखांहून अधिक रक्कमेचे शेअर खरेदी करताना

· १० लाखांहून अधिक अचल संपत्तीची खरेदी विक्री करताना

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat