आर्थिक स्थिती कोलमडलेल्या पाकला दणका

    दिनांक  15-Jul-2019


जागतिक बॅंकेकडून ९४ हजार कोटींचा दंड

 
 

इस्लामाबाद : आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी थांबता थांबत नसून आता जागतिक बॅंकेच्या एका निर्णयामुळे ५.९७ अब्ज म्हणजे तब्बल ९४ हजार कोटी पाकिस्तानी रुपये इतका दंड बसणार आहे. पाकिस्तानने रिको डिक योजनेअंतर्गत २०११ मध्ये एका कंपनीला खनिज उपसा करण्यासाठी नकार दर्शवल्याने हा भूर्दंड बसला आहे.

 

पाकिस्तान आणि कंपनीमध्ये वाद

बलुचिस्तान सरकारने या भागातील खनिज उत्खननास परवानगी नाकारल्यानंतर टेथयान कॉपर कंपनीने (टीसीटी) जागतिक बॅंकेची दारे ठोठावत आंतरराष्ट्रीय विवाद समाधान केंद्रात धाव घेतली होती. चिली येथील उत्खनन कंपनी एटोफगास्टा आणि कॅनडातील गोल्ड कॉरपॉरेशनच्या संयुक्त विद्यमाने ही कंपनी चालवली जाते.

 

११.४३ अब्ज इतका दंड ठोठावला

पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानवर ४.०८ अब्ज इतका दंड आणि १.८७ अब्ज इतके व्याज आकारण्यात येणार आहे. कंपनीने नुकसान भरपाई म्हणून एकूण ११.४३ अब्ज डॉलर्स इतक्या रक्कमेचा दावा केला होता. पाकिस्तान सरकार आणि कंपनीमध्ये गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते. 

 

सोन्याची खाण

बलुचिस्तान येथील चागई जिल्ह्यात हे खनिज उत्खनन केले जाणार होते. इराण व अफगाणिस्तानच्या सीमारेषेकडून हा भागजवळ आहे. या भागात जगातील पाचव्या क्रमांकाची खनिजांची खाण मिळेल, असा अंदाज आहे. रिको डीग खदान ही तांब्यासाठी प्रसिद्ध आहे.

 

२०११ मध्ये कंपनीचे काम बंद पाडले

टीसीसी कंपनीतर्फे २०१० मध्ये एक विस्तृत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल बलुचिस्तान सरकारला देण्यात आला होता. यासह पर्यावरण आणि जनजीवनावर होणाऱ्या प्रभावाबद्दलही अहवाल देण्यात आला होता. बलुचिस्तान सरकारने या कंपनीला परवानगी नाकारत नोव्हेंबर २०११ रोजी काम बंद पाडले होते.

 

इम्रान खान यांनी मागवला अहवाल

एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहीतीनुसार, पाकिस्तनाचे पंतप्रधान इम्रान यांनी या प्रकरणी एक अहवाल मागवला असून देशाला होणाऱ्या नुकसानीचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक समिती नेमण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat