'मोगरा फुलला' अमेझॉन प्राईमवर पाहता येणार

15 Jul 2019 13:26:55



स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असलेला 'मोगरा फुलला' हा चित्रपट आता प्रेक्षकांना अमेझॉन प्राईमवर देखील पाहता येणार आहे. तुमच्या आमच्या सारख्या सध्या सरळ माणसांची एक कथा मोगरा फुलाला या चित्रपटात मांडली आहे. बाहेरच्या देशात राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा मातीशी असलेले नाते पुन्हा एकदा अनुभवायचे असल्यास हा चित्रपट जरूर पाहावा असे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.



'मोगरा फुलला' हा चित्रपट श्राबनी देवधर यांनी दिग्दर्शित केला असून १४ जून ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, आनंद इंगळे, यांशिवाय सुहिता थत्ते, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नाळीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0