हृतिक आणि टायगर मध्ये रंगणार 'वॉर'

    दिनांक  15-Jul-2019


हृतिक रोशन आणि रायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित


सिद्धार्थ
आनंद दिग्दर्शित 'वॉर' या आगामी चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. यश राज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा चित्रपटाची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या टीजरमध्ये हृतिक आणि टायगर एकमेकांना युद्धात भिडताना दिसत आहेत. त्या दोघांचेही आक्रमक रूप या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. धूम चित्रपटानंतर पुन्हा एकदा हृतिक अशा ऍक्शन फिल्म मध्ये झळकणार आहे.दरम्यान सुपर डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिक रोशनचा 'सुपर ३०' नुकताच प्रदर्शित झाला. आणि त्याविषयी सध्या चित्रपट सृष्टीत चर्चा सुरु आहे. त्यातच आज आलेल्या 'वॉर' चित्रपटाच्या टीजर वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 'वॉर' हा चित्रपट हिंदी,तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून येत्या ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat