क्रिकेटचे नवे 'सुपर' विश्वविजेते यजमान इंग्लंड

    दिनांक  15-Jul-2019


 


४४ वर्षाचा वनवास संपला... अखेर इंग्लंडच्या घरी सजणार विश्वचषक  


लंडन : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंगलंडच्या संघाने नवा इतिहास रचला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला मात देत विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंडने चौथ्यांदा तर न्यूझीलंडने दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. परंतु एकदाही या दोन्ही संघाना विश्वचषक जिंकता आला नव्हता. मात्र, याला खंड पाडत इंग्लंडच्या संघाने अखेर विश्वचषकाच्या अंतिम सामान्यांमधील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून रचला अनोखा इतिहास. सुपर ओव्हरही टाय झाल्यानंतर अखेर चौकारांच्या जोरावर इंग्लंडचा विजय निश्चित करण्यात आला.

 

न्यूझीलंडने टॉस जिंकत पाहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने सावध सुरुवात केली. सुरुवातीला ख्रिस वोक्सने आक्रमक वाटणाऱ्या मार्टिन गप्टीलला अवघ्या १९ धावांवर बाद पहिली विकेट घेतली. त्यानंतर कर्णधार केन विलियमसनने सलामीवीर हेनरी निकोल्सच्या साथीने ७४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु, इंग्लंडच्या लियाम प्लंकेटच्या माऱ्यासमोर दोघांनीही टिकाव धरता आला नाही. पहिले विलियमसनला ३० धावांवर तर निकोल्सला ५५ धावांवर बाद केले. त्यानंतर एकही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. टॉम लॅथमच्या ४७ धावा वगळता कोणत्याही फलंदाजाला २०चा आकडा पार करता आला नाही. ५० षटकांमध्ये न्यूझीलंडला ८ विकेट गमावून २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

 

२४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात लडखडतच झाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ ८६ धावांमध्ये ४ विकेट होत्या. ज्यामध्ये जॉनी बेअरस्ट्रोने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्यानंतर बटलर आणि स्टोक्सच्या ११० धावांच्या शतकी भागीदारीने इंग्लंड संघाला पुन्हा सामन्यामध्ये आणले. परंतु बटलरला फर्ग्युसनने ५९ धावांवर बाद करत सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच आणला. बेन स्टोक्सच्या फर्ग्युसन आणि निशामने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर हेन्री, ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. नंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने १५ धावा करून न्यूझीलंडला १६ धावांचे आव्हान दिले. अखेर न्यूझीलंडला १५ धावांमध्ये रोखून इंग्लडला विश्वविजेता ठरले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat