'हमे तो अपनोने लुटा, ...' बरखा दत्त यांचे सिब्बलांवर आरोप

    दिनांक  15-Jul-2019


 


नवी दिल्ली : काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे स्वतःचे न्यूज चॅनेल 'तिरंगा टीव्ही' सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांनी पगार न देता २०० पत्रकारांना कामावरून काढून टाकले आहे असा आरोप पत्रकार बरखा दत्त यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवर ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. सिब्बल यांनी ६ महिन्यापासून पत्रकारांना वेतन न देता काढून टाकण्यात आले.

 
 
 

कपिल सिब्बल आणि त्यांच्या पत्नींवर आरोप करत त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटले की, या टीव्ही चॅनल्सही निगडित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नोकऱ्या सोडून या चॅनेलसाठी काम केले. परंतु, तब्बल २ वर्ष चाललेले हे चॅनेल बंद होण्यापूर्वी सिब्बल आणि त्यांच्या पत्नीने साधा संवादही साधला नाही. सर्व लाईव्ह प्रक्षेपण अवघ्या ४८ तासांमध्ये रद्द करण्यात आले.

 
 
 

बरखा दत्त यांनी सिब्बलांना विजय मल्ल्याचीही उपमा दिली. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, मला असे सांगण्यात आले आहे की सर्व कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे कारण देत कामावरून काढून ऐकण्यात आले. सिब्बल असे कर्मचाऱ्यांना सांगतायत की पंतप्रधान मोदी हा चॅनेल चालवून देत नाही आहेत. पण यात काही तथ्य नाही. भारत सरकारचा यात काहीही संबंध नाही. दोघांनीही कर्मचाऱ्यांना सामोरे न जाता लंडनला पळाले. म्हणून त्यांची तुलना ही विजय मल्ल्यासोबत करणे भाग पडले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat