गर्लफ्रेंड च्या ज्यूकबॉक्समध्ये आणखी एक गाणे येणार

    दिनांक  13-Jul-2019उपेंद्र
सिधये दिग्दर्शित 'गर्लफ्रेंड' चित्रपटामधील आणखी एक सुमधुर गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला असून पूर्ण गाणे ऐकण्यासाठी प्रेक्षकांना १५ जुलै पर्यंत वाट पाहावी लागणारे. थोडे सोपे, थोडे अवघड असे हे कोडे! या गाण्याचा टीजर बघून पूर्ण गाणे पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल यात शंका नाही. साई ताम्हणकर ने या गाण्याचा टीजर सोशल मीडियावर आज पोस्ट केला.


साई ताम्हणकर आणि अमेय वाघ या चित्रपटात अलिशा आणि नचिकेत या भूमिका साकारणार आहेत. त्यांची ही प्रेमकहाणी काय आहे हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान या चित्रपटातील 'नच्या गॉट गर्लफ्रेंड' आणि 'लव स्टोरी' अशी दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. आता या जुकबॉक्समध्ये आणखी एका गाण्याची लवकरच भर पडणार आहे. 'गर्लफ्रेंड' हा चित्रपट २६ जुलै ला महाराष्ट्रभर प्रदर्शित होईल.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat