अबब! डेटा लीक प्रकरणी फेसबुकला एवढा मोठा दणका

13 Jul 2019 18:29:30
 

 

मुंबई : केंब्रिज अ‍ॅनालिटिका डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर ५ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच ३४ हजार कोटी रुपये दंड ठोठावला आहे. एखाद्या टेक्नॉलॉजी कंपनीला ठोठावलेला आजवरचा हा सर्वाधिक दंड आहे. याआधी २०१२ मध्ये गूगलला २२ मिलियन डॉलर्सचा दंड ठोठावला होता. वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणात फेसबुक वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीचा गैरवापर केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आला आहे.
 

या प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड या कमिशनकडे होती. मार्च २०१८ मध्ये फेसबुक डाटा लिक प्रकरण समोर आले होते. त्याचवेळेस फेसबुकवर कारवाई होणार हे स्पष्ट झाले होते. वापरकर्त्यांची डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षिततेत चूक झाल्याचे वरील ट्रेड फेडरल कमिशनच्या तपासातून समोर आले होते. परंतु याबाबत फेसबुक व ट्रेड फेडरल कमिशन कडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

 
२०१७ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीने जवळपास ८ कोटी फेसबुक युजर्स चा डेटा चोरून वापरला, असा आरोप करण्यात आला होता. निवडणुकांच्या दरम्यान याचा वापर ही करण्यात आला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0