नवाझुद्दीन या चित्रपटासाठी गाणार रॅप सॉंग

    दिनांक  13-Jul-2019नवाझुद्दीन
सिद्दीकी सध्या सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सवरील त्याच्या आगामी वेब सिरीजमुळे चर्चेत आहेच मात्र आज आणखी एका गोष्टीमुळे तो ट्रेंडिंग आहे. ती गोष्ट म्हणजे आगामी चित्रपटात तो चक्क रॅप सॉंग गाणारे. त्याचा भाऊ शम्स नवाब सिद्दीकी दिग्दर्शनात पदार्पण करणार असून 'बोले चुडिया' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपट 'स्वॅगी चुडिया' या रॅप सॉंगमध्ये नवाझुद्दीन रॅप करणार आहे.


मौनी रॉय या चित्रपटामधून बाहेर पडल्यानंतर तमन्ना भाटिया या चित्रपटात नवाझुद्दीन बरोबर स्क्रीनवर झळकणार असून ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. मौनी रॉय चा विचार करता ती आगामी काळात आलीआ भट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या ब्रम्हास्त्र या चित्रपटात देखील झळकणार आहे ज्यामध्ये ती खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. तसेच राजकुमार राव च्या 'मेड इन चायना' या चित्रपटात देखील ती महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat